Sudhir Mungantiwar । भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा ‘मिशन 45’ ची सुरुवात चंद्रपूरमधून केली. भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज आज दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर उपस्थित होते.
‘अब की बार 400 पार’, मोदींना पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान करणार आहोत, सुधीर मुनगंटीवार यांचा आवाज आजपर्यंत राज्यात घुमत होता आता तीच तोफ दिल्लीत धडाडेल, सुधीर मुनगंटीवार मोठ्या मतांनी विजयी होतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
…तर पुढील पाच वर्ष तुमच्या डोळ्यात पाणी येईल Sudhir Mungantiwar ।
तर तुम्ही डोळ्यातील अश्रू पाहून, वैयक्तिक सहानुभूतीवर मतदान कराल, तर पुढील पाच वर्ष तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतःच करावी लागेल, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस उमदेवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं सुरुवातीला भाषण झालं. बावनकुळे यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री आणि वनमंत्री म्हणून केलेल्या कामाचं कौतुक केलं.
काँग्रेस कुंभकर्णापेक्षा पुढे Sudhir Mungantiwar ।
माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवार सोबत नाही. मी विकासाबद्दल बोलणार, समोरच्या उमेदवार यांनी त्यांचे सरकार असताना किती काम केले, किती दिवे लावले हे सांगितले पाहिजे.. सत्तेत असताना किती झोपा काढल्या हे सांगायला पाहिजे. काँग्रेस कुंभकर्णापेक्षा पुढे आहे. कुंभकर्ण म्हणेल काँग्रेसवाले तर माझेही बाप आहेत. मी सहा महिने झोपायचो हे वर्षभर झोपतात. असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
हेही वाचा
दिवंगत पतीच्या आठवणीत प्रतिभा धानोरकर भावूक; म्हणाल्या “चंद्रपूरचा गड…”