Sudha Murthy। इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका ‘सुधा मूर्ती’ यांची राज्यसभेवर निवड करण्यात आलीय. सुधा मूर्ती यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. 74 व्या प्रजासत्ताक दिनी भारत सरकारने पद्म पुरस्कारांसाठी जाहीर केलेल्या नावांमध्ये सुधा मूर्ती यांच्या नावाचाही समावेश होता.
सुधा मूर्ती हे औद्योगिक जगतातील एक मोठे आणि प्रतिष्ठित नाव आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज त्यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. सुधा मूर्ती या इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधा मूर्ती यांच्या राज्यसभेच्या निवडीविषयी माहिती दिली. त्यासाठी त्यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी , ‘मला आनंद आहे की भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकित केले आहे.
सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह अनेक क्षेत्रात सुधाजींचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. राज्यसभेतील तिची उपस्थिती ही आपल्या ‘महिला शक्ती’चा एक सशक्त पुरावा आहे,
जी आपल्या देशाचे भवितव्य घडवण्यात महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो. असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. । Sudha Murthy
सुधा मूर्ती तब्बल इतक्या कोटींच्या मालकीण – । Sudha Murthy
सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा देखील आहेत. सुधा मूर्ती महिला आणि मुलांसाठी सतत काम करत आहेत. त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत. खरं तर, सुधा मूर्ती यांनीच 1981 मध्ये इन्फोसिसच्या लॉन्चिंगवेळी त्यांचे पती एनआर नारायण मूर्ती यांना 10,000 रुपयांचे कर्ज दिले होते.
त्याच्या मोबदल्यात त्यांना दिलेल्या इन्फोसिस कंपनीमधील मालकीच्या 0.95 टक्के मालकी देण्यात आली. त्याच मोबदल्यात त्यांना वर्षाला 300 कोटी रुपये दिले जातात. सुधा मूर्ती यांनी स्वतः टीव्ही शोमध्ये सांगितले की, त्यावेळी ते भाड्याच्या घरात राहत होते आणि पैशांची कमतरता होती.
मात्र, आता सुधा मूर्ती या एकूण 755 कोटींच्या मालकीण आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुधा मूर्ती यांनी आतापर्यत 30 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं एकूण मूल्य 5,772.6 कोटी रुपये इतकं आहे.
सध्या सुधा मूर्तींची वार्षिक कमाई 300 कोटी रुपये इतकी आहे. इन्फोसिस कंपनीमध्ये त्या पहिल्या गुंतवणूकदार होत्या. नारायण मूर्तींनी पुण्यात 1981 साली इन्फोसिसची सुरुवात केली तेव्हा त्यांना पहिल्यांदा सुधा मूर्तींनीच मदत केली आहे. 1996 सालापासून सुधा मूर्ती इन्फोसिस फाऊंडेशनचं काम पाहतात.
त्या मागील 25 वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. नुकतीच त्यांची जागा इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी घेतली. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्तींची एकूण संपत्ती 37,465 कोटी रुपये इतकी आहे.
सुधा आणि नारायण मूर्ती यांना दोन मुले – । Sudha Murthy
सुधा आणि नारायण मूर्ती यांना दोन मुले आहेत. त्यांची मुलगी अक्षता मूर्ती सध्याचे ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी आहेत. ब्रिटनमध्ये राहणारी भारतीय फॅशन डिझायनर म्हणूनही अक्षता यांची ओळख आहे.
त्याच वेळी, त्यांचा मुलगा रोहन मूर्ती हा अमेरिकेतील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म सोरोकोचा संस्थापक आहे, जो डेटा अशा अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतरित करण्यात मदत करतो.