बॉलीवूडचा हॅंडसम हंक कार्तिक आर्यन सध्या इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे, यात शंका नाही आणि नशिबाने साथ दिली तर तो लवकरच बॉलिवूडचा राजकुमार म्हणून ओळखला जाईल..त्याचा शहजादा हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. कार्तिकनेही यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पूर्ण ताकद लावली आहे. पण त्याच दरम्यान, कार्तिक आर्यनसोबत असे काही घडले, ज्याचा त्याने विचारही केला नसेल. त्याला दररोज अनेक चाहते मिळतात, परंतु यावेळी कार्तिकवर एका चाहत्याने हटके स्टाईलमध्ये प्रेमाचा वर्षाव केला आहे.
त्याचं झालं असं की, कार्तिक सध्या वेगवेगळ्या शहरात जाऊन चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. यादरम्यान तो कारमधून कुठेतरी जात असताना एक मुलगा त्याच्या कारसह भरधाव वेगाने आला आणि त्याने कार्तिकचे नाव जोरात घेतले. हे पाहून कार्तिकनेही त्याला हात दाखवला, पण नंतर त्या मुलाने अतिशय हटके पद्धतीने कार्तिकला फ्लाइंक किस दिली आणि हे पाहून कार्तिकला हसू आवरता आले नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओवर कमेंट्स महापूर पडत आहे. एका युजरने लिहिले,’भाऊ कारमध्ये असता चुंबन घेतो, बाहेर असता तर त्याने काय केले असते माहित नाही.’
कार्तिक आर्यनचा शहजादा 17 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. ज्यामध्ये त्याच्या विरुद्ध कृती सेनन आहे. हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी प्रकारातील फॅमिली ड्रामा आहे आधी हा चित्रपट 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता पण त्यानंतर तो एक आठवडा पुढे सरकवण्यात आला. हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या अल्ला बैकुंथापुरमलोचा हिंदी रिमेक आहे.