ब्रम्होस क्षेपणास्त्राची आयएनएस चेन्नईवरून चाचणी यशस्वी

चेन्नई – भारतीय नौदलाने स्वत: विकसीत केलेल्या युध्दनौका आयएनएस चेन्नईवरून सुपरसॉनिक क्रुझ मिसाईल्स ब्रम्होसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ब्रम्होसने अत्यंत उच्च क्षमतेच्या आणि अडथळण्यांची चाचणी पार करत आपला लक्ष्यभेद केला, असे डीआरडीओने निवेदनात म्हटले आहे.

ही चाचणी यशस्वी झाल्याने आयएनएस चेन्नईमध्ये ब्रम्होस तैनात करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे समुद्रातील लांब अंतरावरील लक्ष्यांचा भेद करणे शक्‍य होणार आहे. ब्रम्होस आयएनएस युध्दनौकेवर तैनात केल्याने आणखी एक युध्दनौका क्षेपणास्त्र सज्ज बनली आहे.

ब्रम्होस हे भारत आणि रशीया यांनी संयुक्तरित्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. ओडिशातील बालसोर येथील तळावरून 400 किमी पल्ल्याच्या ब्रम्होस क्षेपणास्त्राची चाचणी 30 सप्टेंबरला घेण्यात आली होती.

चीन बरोबर तणाव निर्माण झाल्यानंतर लडाख आणि अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ब्रम्होस क्षेपणास्त्र मोट्या संख्यने तैनात करण्यात आली आहे. ब्रम्होस हे क्षेपणास्त्र पाणबुडी, युध्दनौका, विमाने आणि जमीनीवरूनही प्रक्षेपित करता येतात. ब्रम्होस क्षेपणास्त्रांची सुखोई विमानातून यशस्वी चाचणी हवाई दलाने घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.