अफगाणिस्तानमधील स्फोटात 12 ठार; 100 जखमी

काबुल – अफगाणिस्तानमधील घोर प्रांतात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या एका आत्मघातकी कार बॉम्बच्या स्फोटात किमान 12 जण ठार झाले आणि 100 अन्य लोक जखमी झले आहेत.

घोर प्रांतातील रुग्णालयामध्ये गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या डझनभर नागरिकांवर उपचार सुरू आहेत, असे रुग्णालयाच्या प्रमुखांनी सांगितले. या बॉम्बस्फोटामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची भीतीही या अधिकाऱ्याने व्यक्‍त केली आहे.

स्फोटके भरलेली कार प्रांतिय पोलीस प्रमुखांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला धडकवून हा स्फोट करण्यात आला होता. या परिसरात इमारतीमध्ये अन्य सरकारी कार्यालयेही आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तालिबानचे प्रतिनिधी आणि अफगाणिस्तानच्या सरकरी अधिकाऱ्यांमध्ये कतारमध्ये चर्चा सुरू असतानाच हा स्फोट घडवून आणला गेला आहे.

अफगाणिस्तानमध्ये दशकभरापासून सुरू असलेला हिंसाचार संपवण्यासाठी ही चर्चा केली जात आहे. तालिबानने दक्षिण अफगाणिस्तानमधील हिंसाचार थांबवण्याची हमी शुक्रवारीच दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.