मुंबई – मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमात वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेता ‘सुबोध भावे’ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला आहे. दरम्यान, सुबोध आता पुन्हा एकदा नव्या इनिंग साठी सज्ज झाला असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लहान मुलांशी संपर्क साधणार आहे. त्यांच्यासाठी तो मजेदार गोष्टींचा खजाना घेऊन आला आहे.
सुबोध व्हिडीओच्या माध्यमातून छोट्या मित्रांना छान छान गोष्टी सांगत आहे. त्याने ट्विट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. यावेळी तो लेखक श्याम कुरळे यांची ‘मारुती आश्चर्यचकित का झाला?’ ही गोष्ट सांगणार आहे. ही एक विनोदी गोष्ट आहे.
“नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो, श्याम कुरळे यांची एक गंमतशीर गोष्ट मी घेऊन आलोय… मारुती आश्चर्यचकित का झाला? आता विचार करा ज्या गोष्टीचं शीर्षकच इतकं विनोदी आहे ती गोष्ट सांगताना मला किती मज्जा आली असेल.” असं त्याने आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे.
नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो,
श्याम कुरळे यांची एक गंमतशीर गोष्ट मी घेऊन आलोय… “मारुती आश्चर्यचकित का झाला” ? आता विचार करा ज्या गोष्टीचं शीर्षकच इतकं विनोदी आहे ती गोष्ट सांगताना मला किती मज्जा आली असेल 🙂
.
.
Story Link – https://t.co/z6k2895qxz#SubodhDadaChiGoshta pic.twitter.com/8byxm3dBWo— Subodh Bhave (@subodhbhave) May 2, 2020