स्टंप माईकमुळे भारताचा विजय हुकला

मेलबर्न : भारताच्या महिला संघाचा ऑस्ट्रेलियातील तिरंगी क्रिकेट मालिकेत अंतिम लढतीत झालेल्या पराभवात स्टंप माइक हे एक कारण ठरले आहे.
भारताला विजयासाठी 156 धावांचे आव्हान मिळाले होते. भारताला 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. स्मृती मानधनाने अर्धशतक केले. मात्र तरीही संघाचा पराभव झाला. स्टंप माईकमुळे एक फलंदाज बाद होता होता वाचली.

भारताच्या क्षेत्ररक्षकाच्या हातून स्टम्प माईकच्या वायरला चेंडू लागला व वायर तुटली व चेंडू भरकटला. अरुंधती रेड्डीच्या गोलंदाजीवर लेनिंगने एक धाव घेतली. शिखा पांडेने लेनिंगला धावबाद करण्यासाठी चेंडू यष्टीवर फेकला. चेंडू माईकच्या वायरला लागला व भरकटला. लेनिंग धावबाद होण्यापासून बचावली. जर ती बाद झाली असती तर ऑस्ट्रेलियाचा डावही लवकर संपला असता व निकाल वेगळा झाला असता.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here