वाईत “दिशा’च्या गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक

वाई – येथील सुमन एज्युकेशन सोसायटी संचालित दिशाच्या विविध शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली. त्याबद्दल या यशस्वी विद्यार्थ्यांची वाई शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

वाई दिशा अकॅडमीचा जेईई ऍडव्हान्स आय.आय.टी सर्वोत्कृष्ट निकाल लागला आहे. यामध्ये तेजस जगताप (रॅंक 499), दीपराज महाडीक (रॅंक 1498), स्वराज लोखंडे (रॅंक 2534), सारंग योगी (रॅंक 2920) या चार विद्यार्थ्यांची आय.आय.टी. प्रवेशासाठी निवड झाली. तर दिशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे स्टाफ सिलेक्‍शन कमिशनमध्ये लेखी परीक्षेत मयुर मोहिते, अमोल गायकवाड, समीर शिर्के, स्वाती चौधरी, अर्जुन कराडे, किरण देवकर यांची उज्वल यश मिळविले आहे.

तसेच महाराष्ट लोकसेवा आयोग यांच्याकडून घेण्यात आलेल्या ग्रुप – बी (पी.एस.आय/ एसटीआय/ एएसओ) या पूर्व परीक्षेत पंकज पोळ, दत्तात्रय रासकर यांनी यश मिळविले. दिशा पब्लिक स्कूलच्या इयत्ता पाचवीतील 17 विद्यार्थी व आठवीतील 13 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले असून पहिल्या बॅंचचे इयत्ता आठवीचे विद्यार्थी शुभम शिवाजी पाटील (राज्यात 12 वा), वेदांत संतोष शिंदे (राज्यात 18 वा), आकाश योगेश जगताप (जिल्ह्यात 158 वा) यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत तर इयत्ता पाचवीतील विद्यार्थींनी स्वराली प्रसाद कोहळे (जिल्ह्यात 24 वी) ही पूर्व उच्चा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली.

तिची निवड जवाहर नवोदय विद्यालयात झाली आहे. या दिशा परिवाराच्या विविध विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थी पालक, शिक्षक सहभागी झाले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे दिशा परिवाराचे संस्थापक डॉ. प्रा. नितीन कदम, प्रा. रुपाली कदम, प्रा. ताजुद्दीन सय्यद तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.