‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी ‘ या पुस्तकाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी रोष वक्त केला आहे. सोमवारी सकाळी फर्गसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी आंदोलन केले. यावेळी संतोष रासवेसह 50 हुन विद्यार्थी उपस्थित होते. विविध संघटनांनी या पुस्तकावर बंदी मागणी केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीस्थित कार्यालयात ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. प्रकाशनाच्या वेळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी आणि पुस्तकाचे लेखक भगवान गोयल उपस्थित होते.