विद्यार्थी, प्रवासी व ग्रामस्थांची मागणी
लोणी धामणी-मंचर ते भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दत्तात्रयनगर-पारगाव (ता.आंबेगाव) पर्यंत येणारी एसटी बस लोणी पर्यंत सुरू करावी अशी मागणी सरपंच सागर जाधव, अनिल डोके, मनीषा कुरकुटे, मीरा पोखरकर, कोंडीभाऊ आदक, मनोज तांबे, सामाजिक कार्यकर्ते उध्दव लंके व भगवान सिनलकर यांनी केली आहे.
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात वडगावपीर, लोणी, खडकवाडी, पहाडदारा, शिरदाळे, धामणी येथील विद्यार्थी व कारखानाच्या कामासाठी ग्रामस्थ येत असतात. परंतू एसटी बस साखर कारखान्यापर्यंत येत असल्यामुळे लोणी, धामणी परिसरातील विद्यार्थी, प्रवासी व ग्रामस्थांना बऱ्याच वेळा मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो.शिवाय लोणीपर्यंत येणाऱ्या एसटी बसेस मर्यादित असतात. त्यामुळे सर्वच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी साखर कारखानापर्यंत येणाऱ्या एसटी बसेस लोणीपर्यंत आल्या तर सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. तेव्हा वरील एसटी बसेस लोणीपर्यंत चालू करण्याची मागणी विद्यार्थी, प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
- सध्या पुणे जिल्ह्यात प्रत्येक तालुुक्यात एसटी आगार आहे. पण आंबेगाव तालुक्यासाठी एसटी आगार मंजूर झाले असूनही अजून ते कार्यन्वित झालेले नाही. त्यामुळे तालुक्यात एसटी बसेस कमी पडतात. जर हा एसटी आगार सुरू झाले तर ही समस्या भेडसवणार नाही.
उध्दव लंके, सामाजिक कार्यकर्ते.