अजब! आकाशातून नऊ तारे अचानक गायब तब्बल

70 वर्षानंतर चर्चा सुरू एलियन्स असण्याची शक्यता
न्यूयॉर्क : 70 वर्षांपूर्वी म्हणजे 1950 मध्ये घडलेल्या एका अतर्क्य घटनेची चर्चा सध्या सुरू आहे. अमेरिकेतील एका प्रयोगशाळेने अवकाशातील काही छायाचित्रे घेतली होती. या छायाचित्रांमध्ये अवकाशात काही विचित्र आणि वेगळे तारे नजरेस आले होते. पण अर्ध्या तासानंतर घेतलेल्या दुसऱ्या छायाचित्रांमध्ये हे तारे अचानक गायब झाल्याचे लक्षात आले.

12 एप्रिल 1950 रोजी ही घटना घडली होती आणि तब्बल 70 वर्षानंतर चर्चा सुरू झाली आहे. या छायाचित्रांचा शोध भारतासहित स्वीडन स्पेन अमेरिका युक्रेन येथील शास्त्रज्ञ करत आहेत. गायब झालेले हे नऊ तारे म्हणजे परग्रहवासीयांचे एखादी स्पेस शिप असावी असाही एक अंदाज समोर आला आहे.

स्वीडनमधील नॉर्डिक इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल फिजिक्सचे शास्त्रज्ञ आणि स्पेनच्या इन्स्टिट्यूट फिजिकाचे शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अवकाशात एखादी दुसरी दुनिया असू शकते. अवकाशात कोठेतरी परग्रहवासी असू शकतात याबाबत शक्यता व्यक्त करणारे हे संशोधन या नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या भारतीय संस्थेचे सायंटिस्ट आलोक गुप्ता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या छायाचित्रांची व्यवस्थित माहिती घेतल्याशिवाय नक्की निष्कर्ष काढता येणार नाही. पण आकाशात अशा प्रकारचे तारे नसतात त्यामुळे हे नक्की काय आहे. याचा शोध घ्यावा लागेल अवकाशातील घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या वास्को या संस्थेच्या मते मात्र गायब झालेले हे तारे म्हणजे एलियन्स असू शकतात.

या छायाचित्रांवर अभ्यास करण्याची परवानगी या संस्थेने मागितली आहे अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा आणि दुर्बीण यांचा वापर करूनही शास्त्रज्ञांना या नऊ तार्‍यांचा कोठेही शोध लागला नसल्याने आता अवकाशात दुसरी दूनिया असल्याबाबत संशोधन सुरू करण्यास वेग आला आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.