करोना लसीवरून राडा! लस घेण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी; १२ जण जखमी

मुंबई :  राज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे वारंवार करोना लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. मुंबई, ठाणे, वसई विरारसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. यामुळे लस घेण्याच्या प्रतिक्षेत असलेले नागरिक हैराण झाले आहेत.

तर दुसरीकडे  तिसरी लाट रोखण्यासाठी जास्त प्रमाणावर लसीकरण गरज असल्यामुळे सध्या लसीकरण केंद्रावरचं नागरिक तुफान गर्दी असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र लस तुटवड्यामुळे अनेक केंद्रावर नागरिकांकडून लस घेण्यासाठी हाणामारी केली जात आहे .

असेच काहीसे बिहार येथे लसीकरण केंद्रावर झाले आहे. बिहारच्या सीतामढी  जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर लस घेण्यावरून दोन गटावरून तुंबळ हाणामारी झाली आहे. कोरोनाची लस पहिली कोण घेणार? यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहचला की लसीकरण केंद्रावरच एकमेकांशी भिडले. या हाणामारीत १२ पेक्षा अधिक लोक जखमी झाले. 

दरम्यान, लसीकरणासाठी आलेल्या दोन गटातील लोक भिडले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी सुरू झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटने बाबत  स्थानिक पोलिसांना समजताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.