बॉलीवूड स्टार रणवीर सिंह हा नुकताच आपल्या वर्क कमिटमेंट्ससाठी घराबाहेर पडला असता त्याला कोणीही ओळखू शकले नाही. आपल्या विचित्र ड्रेसिंग सेंससाठी ओळखला जाणारा रणवीर पुन्हा एकदा आपल्या हटके अंदाजामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. हा विचित्र अवतार पाहिला असता करोना व्हायरस आपला रस्ता बदलेल असा आहे. यात त्याने संसर्ग रोखण्यासाठी घेतलेली खबरदारी पाहता ती खूपच इंस्पिरेशन देणारी आहे.
रणवीर हा लेटेस्ट फोटोजमध्ये हुड असलेल्या ट्रॅकसूटमध्ये दिसत आहे. तसेच करोनाचा संसर्ग लक्षात घेता त्याने डिझायनर मास्कही घातलेला दिसत आहे. एवढेच नव्हे तर त्याने चष्मादेखील घातलेला दिसत आहे. यात रणवीर हा कोणालाही ओळखू येत नाही. हा फोटो रिकॉर्डिं स्टूडिओ आणि चित्रपटाच्या सेट्सवर स्पॉट करण्यात आला आहे.
सध्या रणवीर हा रोहित शेट्टीसह आपल्या अपकमिंग “सर्कस’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हा चित्रपट शेक्सपियरच्या “द कॉमिडी ऑफ एरर्स’ या प्लेवर आधारित आहे. यात रणवीर हा डबल रोल साकारत आहे. या चित्रपटाचे पुढील महिन्यात ऊटी येथे शूटिंग करण्यात येणार आहे.
दरम्यान, रणवीर सिंहच “83′ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. याशिवाय त्याचा “सूर्यवंशी’ चित्रपटदेखील वेटिंगमध्ये आहे.