शिक्रापूर (प्रतिनिधी) – पिंपळे जगताप ता. शिरूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेशला पाठविण्यात आल्याची माहिती प्राचार्य टी.एम.नायर व चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे.
पिंपळे जगताप ता. शिरूर येथे मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत चालविण्यात येत असलेले जवाहर नवोदय विद्यालय आहे, सध्याच्या लॉक डाऊन मुळे हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील एकवीस विद्यार्थी २२ मार्च पासून येथे अडकले होते.
मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या जवाहर विद्यालय देशयात एकूण ६९० विद्यालय स्थायी असून यापैकी भारतातील १४९ विद्यालयात परराज्यातून माईग्रेशन करिता शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी गेल्या २२ मार्च २०२० पासून अडकले आहेत. त्यापैकी एक पुणे जिल्ह्यातील पिंपळे जगताप ता. शिरूर या विद्यालयाचा समावेश असून या विद्यालयात हिमाचल प्रदेश मधील सोलन जिल्यातील 21 विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले होते, नवोदया विद्यालय समिती मुख्यालय नवी दिल्ली व भारत सरकारच्या आदेशानुसार परराज्यातून आले या सर्व विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेश सोलन येथे पाठवण्याची जवाबदारी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य टी. एम. नायर व विद्यालयाचे शिक्षक चंद्रशेखर कदम यांनी घेतली.
दरम्यान, प्रवासासाठी शासनाच्या नियमानुसार जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी संपर्क करून प्रवास करण्याकरिता हिमाचल सरकारचा NOC व जिल्हाधिकारी पुणे यांच्या अनुमती पत्र प्राप्त करून दोन शिक्षकांचे सोबत या २१ विद्यार्थ्यांना बुसमधून त्यांचा त्यांना हिमाचल प्रदेशात पाठवण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.