मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यसह महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, या बैठकीत राज ठाकरेंनी सरकारनं काही सूचना दिल्या आहेत.
तसेच लॉकडाऊन बाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले लॉकडाऊन केव्हा काढणार, त्याबाबत एक्झिट प्लॅन असावा. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं.
राज ठाकरेंनी सरकारला केलेल्या सूचना
- कंटेन्मेंट झोनमध्ये अधिक फोर्स वाढवा तसेच पोलीस थकले आहेत. ते सुद्धा तणावात आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी गृहित धरलं जातेयत्या ठिकाणी सिआरपीएफ लावून दरारा निर्माण करावा. जेणेकरून लोक बाहेर येऊ नयेत आणि कोरोना पसरु नये.
- खासजी दवाखाने सुरु करावेत. दवाखाने सुरु करताना तिथे पोलीस असावा. गर्दी नियंत्रणात आणण्याचे काम ते करतील.
- राज्यात स्पर्धा परीक्षांचे विधार्थी अडकले आहेत. त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करावी
- हा रमजानचा महिना असल्यामुळे अनेक लोक बाहेर पडत आहेत. अनेक सण आपण घरात साजरे केले. मुस्लिम समाजानेही तसा विचार करावा, जर ऐकत नसेल तर फोर्स लावावी
- शाळा कशाप्रकारे सुरु करणार? ई लर्निंग वगैरे प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. शहरातही अनेक ठिकाणी अशक्य आहे. ती बाब पालकांपर्यंत पोहचवावी.
- परप्रांतिय कामगार महाराष्ट्रात परत येत आहेत. त्यांची येताना तपासणी करावी. तसेच त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करावी. आजपर्यंत जो गोंधळ झाला होता, आता तो सुधारण्याची वेळ आहे.
- आता परप्रांतिय गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांपर्यंत माहिती पोहोचवून त्यांना रोजगार द्यावा. संधी आहे ती घालवू नये
- मनपा, सुरक्षा कर्मचारी यांच्याबाबत सुरक्षेची काळजी घ्यावी. सफाई कामगार आजारी पडत आहेत, त्यांनी हात वर केले, तर शहरांची अवस्था काय होईल? त्यांच्याकडे लक्ष द्यावे
● सरकारचा ‘टाळेबंदी शिथिलता कृती आराखडा’ (Lock-down Exit Plan) काय आहे? सरकार सध्या आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचं निराकरण कसं करणार आहे? कारण लस मिळेपर्यंत टाळेबंदी हा काही उपाय नाही.
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 7, 2020