Stock Market Opening। भारतीय शेअर बाजाराची आज संमिश्र सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स-निफ्टी सपाट पातळीवर व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स किंचित वाढीसह हिरव्या रंगात उघडला. निफ्टी किंचित घसरला. 22100 च्या खाली घसरला आहे.
देशांतर्गत बाजार कसा उघडला?
देशांतर्गत बाजारात, बीएसईचा सेन्सेक्स 19.71 अंकांच्या वाढीसह 72,727 स्तरांवर उघडला. तर दुसरीकडे एनएसईचा 50 शेअर निर्देशांक निफ्टी 23 अंकांच्या घसरणीसह 22,099 पातळीवर उघडला आहे.
हेही वाचा
Paytm वापरकर्त्यांची चिंता मिटली! पेटीएम पेमेंट्स बँकेने Axis बॅंकेत हस्तांतरित केले मुख्य खाते
प्री-ओपनिंगमध्ये बाजाराची हालचाल कशी होती? Stock Market Opening।
प्री-ओपनिंगमध्ये, बीएसई सेन्सेक्स 22.53 अंकांनी वाढून 72,730 स्तरावर होता. एनएसई निफ्टी 16.50 अंकांनी घसरत 22105 स्तरावर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स शेअर्सचे चित्र Stock Market Opening।
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 9 समभाग वाढीसह व्यवहार करत आहेत. 21 समभाग घसरतायत. वाढत्या समभागांमध्ये पॉवरग्रीड 2 टक्क्यांनी आणि कोटक महिंद्रा बँक 1.50 टक्क्यांनी वर आहे. अल्ट्राटेक सिमेंट 0.68 टक्क्यांनी वधारले. घसरलेल्या सेन्सेक्स समभागांपैकी, एम अँड एम आज 1.16 टक्क्यांनी घसरला. बजाज फिनसर्व्ह 1.01 टक्क्यांनी तर ICICI बँक सुमारे 1 टक्क्यांनी घसरून व्यवहार करत आहे.
निफ्टी शेअर्सची स्थिती
निफ्टीच्या 50 समभागांपैकी 20 शेअर्समध्ये वाढ तर 30 शेअर्समध्ये घट दिसून येतीय.. पॉवर ग्रिड देखील सर्वाधिक लाभधारकांमध्ये आहे आणि तो 2.17 टक्क्यांनी वाढला आहे. कोटक महिंद्रा बँक 1.45 टक्के आणि यूपीएल 1.28 टक्क्यांनी वर आहे. अपोलो हॉस्पिटल्स 0.85 टक्के आणि ग्रासिमचा शेअर 0.84 टक्क्यांनी व्यापार करत आहे.
क्षेत्रनिहाय बाजाराची स्थिती
मीडिया, मेटल, फार्मा, रियल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑटो आणि गॅस, हेल्थकेअर निर्देशांक जोरदार वेगाने व्यवहार करत आहेत. तथापि, बँक, ऑटो, एफएमसीजी आणि आयटी समभागांमध्ये घसरणीचे लाल चिन्ह वर्चस्व आहे.
हेही वाचा
FASTag | फास्टॅग सेवेतून पेटीएमला वगळले; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय