मुंबई – शेअर बाजार निर्देशांक सध्या कामलीच्या उच्च पातळीवर असल्यामुळे सावध गुंतवणूकदारांकडून खरेदीबरोबरच विक्री होत आहे. त्यामुळे तीन दिवसाच्या तेजीनंतर शेअर बाजार निर्देशाकात आज अल्प घट नोंदली गेली.
बाजार बंद होतांना मुबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 17 अंकांनी कमी होऊन 58,279 अंकांवर बंद झाला. तर राष्टीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 15 अंकांनी कमी होऊन 17,362 अंकांवर बंद झाला.
आज माहीती तंत्रज्ञान, बॅंका आणि रिऍल्टी क्षेत्राच्या कंपन्याच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले. मात्र वित्तीय व ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनी निर्देशांकांना आधार दिला. मुख्य निर्देशांकांबरोबरच मिड कॅप 0.26 टक्क्यांनी तर स्मॉल कॅप 0.11 टक्क्यांनी कमी झाले. टेक महिंद्रा, सन फार्मा, विप्रो, ऍक्सीस बॅंक या कपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर एअर टेल, एचडीएफसी, ग्रॅसीम, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाल्याचे दिसून आले.
फेडरल रिझर्व्ह नजीकच्या भविष्यात व्याजदरात वाढ करण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जागतीक बाजारातून सकारात्मक संदेश आले. मात्र भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे त्याकडे गुतवणूदारांनी दूर्लक्ष करून विक्री केल्यामुळे निर्देशांकांत घट झाली असल्याचे दिसून आले. निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे आगामी काळातही गुंवणूकदार सावध राहुन व्यवहार करण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. आता आगामी काळात करोना कसे रुप घेतो याकडे गुंवणदारांचे बारीक लक्ष असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.