आळंदी – अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असे २४ तास अपघात व आपत्कालीन सेवा यांसह विविध स्पेशालिटी असलेल्या ‘कमलेश मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अॅण्ड ट्रॉमा केअर सेंटर’चे मोशी आळंदी रोड, डुडुळगाव येथे आमदार दिलीप मोहिते पाटील व आमदार महेश लांडगे भोसरी विधानसभा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रुग्णसेवेचे अखंड व्रत घेऊन संदीप भसे व संतोष भसे यांनी कुटुंबासह या हॉस्पिटलची स्थापना केली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत.
भसे परिवाराने खेड हवेली तालुक्याच्या पंचक्रोशीतील रुग्णांसाठी या अत्याधुनिक हॉस्पिटलची उभारणी केली. हे हॉस्पिटल भविष्यात रुग्णांच्या विश्वासास नक्कीच पात्र ठरेल असा विश्वास यावेळी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केला. तसेच या अत्याधुनिक हॉस्पिटलच्या उभारणीमुळे आळंदी परिसरातील खेड तालुक्यातील रुग्णांना वाजवी दरात आरोग्यसुविधा मिळण्यास नक्कीच फायदा होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, खेड तालुका कृ.उ.बा. समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंतराव भसे, नगरसेवक राहुल कलाटे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष रामशेठ गावडे, नगरसेविका विनयाताई तापकीर, नगरसेविका साधनाताई तापकीर, नगरसेविका सुवर्णाताई बुर्डे, युवा नेते प्रदीप आबा तापकीर, नगरसेविका रुक्मिणी कांबळे, कामगार नेते संतोष कापसे, कामगार नेते योगेश तळेकर, आळंदीचे माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, राष्ट्रवादीचे युवा नेते नवनाथभाऊ तापकीर, उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे, युवा नेते नितीन घुंडरे, उद्योजक सुरेश झोंबाडे, भसे परिवार व त्यांचे सर्व डॉक्टर टीम, तसेच आळंदी, चऱ्होली, मोशी, केळगाव, डुडुळगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तापकीर यांनी केले.