मुंबई – पहिल्या तिमाहीत स्टेट बॅंकेच्या नफ्यात 81 टक्क्यांची वाढ होऊन बॅंकेने 4 हजार 189 कोटी रुपयांचा नफा कमावल्यामुळे या बॅंकेच्या शेअरच्या भावात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, अमेरिकेची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे जागतिक शेअरबाजार निर्देशांकांबरोबरच भारतीय शेअरबाजार निर्देशांक कमी झाले. शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 129 अंकांनी म्हणजे 0.34 टक्क्यांनी कमी होऊन 37,606 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 28 अंकांनी कमी होऊन 11,073 अंकांवर बंद झाला.
आज झालेल्या विक्रीचा फटका ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, वित्त, वाहन क्षेत्रातील कंपन्यांना बसून या कंपन्यांचे शेअर 1.64 टक्क्यांपर्यंत कमी झाले.