स्टेट बॅंकेकडून व्याजदरात 0.05% कपात

मुंबई – इतर बऱ्याच बॅंकांनी आपल्या विविध कर्जावरील व्याजदरात कपात जाहीर केल्यानंतर आता स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपला कर्जावरील व्याजदर (एमसीएलआर) 0.05 टक्‍क्‍यांनी कमी करून तो 8.50 टक्‍के केला आहे.त्याचबरोबर बॅंकेने 30 लाख रुपयाखालील गृहकर्जावरील व्याजदर 0.10 टक्‍क्‍याने कमी केला आहे.

आता या गृहकर्जावरील व्याजदर 8.60 ते 8.90 टक्‍केअसणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेने गेल्या आठवड्यात रेपो दरात पाव टक्‍का कपात करून तो 6 टक्के इतका केला होता. आता इतर बॅंकांही आपल्या एमसीएलआर दरात कपात करण्याची शक्‍यता आहे, असे समजले जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.