सातारा,(प्रतिनिधी) – यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नवीन पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये आता इंजिनिअरिंगच्या मेकेट्रोनिक्स इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्पुटर सायन्स अँड इंजीनियरिंग इन सायबर सेक्युरिटी या पदवी स्तरावरील नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या सोबतच यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना देखील सुरुवात करण्यात आली आहे.
यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये नेहमीच प्रगत आणि अध्यायावत अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जाते याचाच भाग म्हणून इंजीनियरिंग महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, कॉम्पुटर सायन्स इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन इंजीनियरिंग यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या विद्याशाखा मार्फत अभ्यासक्रम पुरवले जात आहेत.
कॉर्पोरेट क्षेत्राच्या उपलब्ध असणाऱ्या संधी आणि गरजा लक्षात घेऊन इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी नेहमीच नवनवीन अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. कॉर्पोरेट क्षेत्राची प्रत्येक गरज भागवणारा युवक हा यशोदा इन्स्टिट्यूटमध्ये तयार झाला पाहिजे असा मानस त्यांचा आहे. यालाच अनुसरून यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील इंजिनिअरिंग विभागांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांना वाढणारी मागणी लक्षात घेऊन काही अभ्यासक्रमांचे प्रवेशक क्षमता देखील वाढ करण्यात आली आहे.
यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये उपलब्ध असणारा स्वतंत्र ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल, हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरती विशेष लक्ष देतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांच्या कार्यकाळामध्ये सॉफ्टस्किल्स, टेक्निकल स्किल्स याची तयारी करून घेतली जाते.
मग अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सोबत प्लेसमेंटच्या देखील विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात. चालू वर्षी फीन ओरॅकल, जॉन डीअर, कमिंस, फोर्स मोटर्स, पेटीएम, जीप्रो ड्राईव्ह, स्पार्क इंडस्ट्रीज, विनसॉफ्ट टेक्नॉलॉजी या आणि अशा विविध कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडले आहेत.
प्रवेशासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसला भेट द्या
सध्याचे युग हे जागतिकीकरणाचं आणि माहिती तंत्रज्ञानासोबतच ऑटोमेशनचा असले कारणाने मेकेट्रॉनिकस इंजिनिअरिंग रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायबर सिक्युरिटी या अभ्यासक्रमांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
सदरच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेण्यासाठी, यशोदा कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधील उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा पाहण्यासाठी आणि प्रवेशा संदर्भात, कागदपत्रांसंदर्भात माहिती घेण्यासाठी यशोदा टेक्निकल कॅम्पसला भेट द्यावी, असे आवाहन, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार बडदापुरे यांनी केले आहे