\n

रोहितने झळकावले झंझावाती अर्धशतक

\n

दरम्यान रोहित शर्माने रोहित शर्माने पन्नास धावांचा टप्पा ओलांडला. रोहितने 33 चेंडूत (सात चौकार आणि दोन षटकार) अर्धशतक पूर्ण केले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे 43 वे अर्धशतक ठरले.

\n

पाथीरानाने मुंबईला दिला तिसरा व मोठा धक्का…

\n

त्यानंतर पाथीरानाने मुंबईला तिसरा धक्का दिला. 130 धावांच्या स्कोअरवर त्याने टिळक वर्माला बाद केले. युवा फलंदाजाने 20 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या. त्याने रोहित शर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर लगेगच तुषार देशपांडेने मुंबईला चौथा धक्का दिला. त्याने 16व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कर्णधार हार्दिक पांड्याला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. कर्णधार पांड्याला सहा चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या.यानंतर टीम डेव्हिड (13) आणि रोमारिया शेफर्ड(01)सारख्या फलंदाजांनी निराशा केली.

\n

वास्तविक, रोहित शर्माला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. रोहित शर्माने एक बाजू संभाळत ङाव संभाळला, पण दुसऱ्या बाजूनं फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले.त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ लक्ष्यापासून 20 धावा दूर राहिला. रोहित शर्माने 63 चेंडूत 105 धावांची नाबाद खेळी केली. या फलंदाजाने आपल्या झंझावाती खेळीत 11 चौकार आणि 5 षटकार ठोकले, पण मुंबई इंडियन्सचा पराभव तो टाळू शकला नाही.

\n

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर, पाथीराना हा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. पाथीरानाने 4 षटकात 28 धावा देत 4 खेळाडूंना आपला बळी बनवले. याशिवाय तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. पाथीराना याने इशान किशन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा आणि रोमॅरियो शेफर्डला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबईच्या पराभवाचे मुख्य कारण पाथीराना ठरला.

\n

आता चेन्नई सुपर किंग्जचे 6 सामन्यांत 8 गुण झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सची 6 सामन्यांत 4 गुणांसह आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचा संघ सातव्या स्थानावर होता.

\n

तत्पूर्वी, या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी याने दिलेला फिनिशिंग टच आणि शिवम दुबे-कर्णधार ऋतुराज गायकवाड या दोघांनी केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकामध्ये 4 विकेट्स गमावून 206 धावा केल्या होत्या.

\n
\n

First half done 💥
\nNow to shine with the ball! 🥳💛 #MIvCSK #WhistlePodu pic.twitter.com/sZWbPoQR3m

\n

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 14, 2024

\n

\n

महेंद्रसिंग धोनी सीएसकेसाठी शेवटच्या षटकात फलंदाजीला आला. खेळपट्टीवर येताच त्याने मैदान गाजवले. धोनीने 4 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. त्याने सलग 3 षटकार मारले. मुंबईसाठी हार्दिक पांड्याने शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने 26 धावा दिल्या. अजिंक्य रहाणे आज सलामीला आला, पण डावाच्या दुसऱ्या षटकात 5 धावा काढून बाद झाला. रचिन रवींद्रने 16 चेंडूत 21 धावांची खेळी खेळली तर डॅरिल मिशेल 17 धावा करून बाद झाला. पण कर्णधार रुतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी सर्वाधिक प्रभावित केले.

\n

चेन्नईकडून रुतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी चमकदार कामगिरी केली. दुबे आणि गायकवाड यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी झाली. दुबेने 38 चेंडूंचा सामना करत नाबाद 66 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. गायकवाडने 40 चेंडूत 69 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले.

\n

धोनीचा फिनिशिंग टच…

\n

15 षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या 149 धावा होती, पण पुढच्या 2 षटकात केवळ 12 धावा झाल्या. त्यामुळे संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता येणार नाही असे वाटत होते. पण शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या धोनीने हार्दिक पांड्याच्या 3 चेंडूत 3 षटकार ठोकले. धोनीने अवघ्या 4 चेंडूत 20 धावा केल्या. हार्दिकने टाकलेल्या शेवटच्या षटकात एकूण 26 धावा आल्या, ज्यामुळे CSK ने 206 धावसंख्येपर्यत मजल मारली.

\n

मुंबईसाठी गोलंदाजीत हार्दिक पंड्या आणि शेफर्ड सर्वात महागडे गोलंदाज ठरले. शेफर्डने 2 षटकात 33 धावा दिल्या. पंड्याने 3 षटकात 43 धावा दिल्या असल्या तरी त्याने 2 विकेट्स घेतल्या. श्रेयस गोपाल आणि जेराल्ड कोएत्झी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IPL 2024 (MI vs CSK Match 29) : रोहितची शतकी खेळी व्यर्थ, चेन्नईने मुंबईला 20 धावांनी केलं पराभूूत…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/InShot_20240415_010544898.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-mi-vs-csk-match-29-chennai-super-kings-beat-mumbai-indians-by-20-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/InShot_20240415_010544898.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-mi-vs-csk-match-29-chennai-super-kings-beat-mumbai-indians-by-20-runs#webpage","name":"IPL 2024 (MI vs CSK Match 29) : रोहितची शतकी खेळी व्यर्थ, चेन्नईने मुंबईला 20 धावांनी केलं पराभूूत…","url":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-mi-vs-csk-match-29-chennai-super-kings-beat-mumbai-indians-by-20-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-mi-vs-csk-match-29-chennai-super-kings-beat-mumbai-indians-by-20-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/04/InShot_20240415_010544898.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-mi-vs-csk-match-29-chennai-super-kings-beat-mumbai-indians-by-20-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-mi-vs-csk-match-29-chennai-super-kings-beat-mumbai-indians-by-20-runs","name":"IPL 2024 (MI vs CSK Match 29) : रोहितची शतकी खेळी व्यर्थ, चेन्नईने मुंबईला 20 धावांनी केलं पराभूूत…"}}]}}}

IPL 2024 (MI vs CSK Match 29) : रोहितची शतकी खेळी व्यर्थ, चेन्नईने मुंबईला 20 धावांनी केलं पराभूूत…