फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्राच्या नुतनीकरणास पालिकेकडून सुरुवात

पिंपरी –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पथारी, हातगाडी, टपरी धारकाना सन 2016 मध्ये राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत त्याचे नुतनीकरण करण्यात आले नव्हते.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार नोंदणी प्रमाणपत्र नुतनीकरणास सुरुवात झाली असून प्रमाणपत्राचे प्रातिनिधिक वाटप खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, अनिल बारवकर, राजू बिराजदार, चंद्रकांत कुंभार, नंदू आहेर व इतर मान्यवर
उपस्थित होते.

मनपाच्या अतिक्रमण कारवाईत अनेकवेळा नोंदणीकृत विक्रेत्यावर ही कारवाई करण्यात येत होती. या प्रकाराला महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने विरोध केला होता. यानंतर महापालिकेने नोंदणीकृत विक्रेत्यांवरील कारवाई शिथिल केली होती. मात्र, अनेक फेरीवाल्यांच्या परवान्याचे नुतनीकरण न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता नुतनीकरण परवान्याचे प्राधिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले असून ज्यांचे बायोमेट्रीक पुर्ण झाले आहे अशा विक्रेत्यांनी फेरीवाला प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहान नखाते यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.