नगर – राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीमध्ये महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी प्रवाशात वाढ होवून उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यातच आता एसटीचे सारथ्य महिला चालकांच्या हाती सोपविण्यात येत आहे. यामध्ये नगर येथील 3 महिलांची चालक पदासाठी निवड झाली आहे.
एसटीए महामंडळात महिलांनी वाहक म्हणून अनेक वर्षांपासून जबाबदारी सांभळली आहे. आता एसटी सारख्या अवजड वाहनाचे सारथ्य प्रथमच महिला चालक करणार आहेत. परिवहनच्या सेवेत महिला चालक देखील रुजू झाल्या असून नुकत्याच माधवी संतोष साळवे बी. क्र. 41744 यांनी सिन्नर-नाशिक मार्गावर एसटी बस चालवून नव्या पर्वाची सुरवात केली. नगर येथील 3 महिलांची चालक पदासाठी निवड झाली.