IPL 2024, Chennai Super Kings : आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात काही तासातच सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईसमोर वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाच्या ( Matheesha Pathirana ) रूपाने मोठी समस्या होती, ती आता दूर झाली आहे. वास्तविक, दुखापतग्रस्त पाथिराना बेंगळुरूविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी तंदुरुस्त झाला आहे, ही सीएसकेसाठी मोठी बातमी आहे.
चेन्नई RCB विरुद्ध चेपॉकमध्ये पहिला सामना खेळणार आहे, त्याआधी पाथीरानाच्या व्यवस्थापकाने त्याच्या फिटनेसची चांगली बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पाथीरानाच्या व्यवस्थापकाने एक पोस्ट टाकली आहे. त्यानं लिहलं आहे की, “पथिराना कुठे आहे? उत्तर असे आहे की तो तंदुरुस्त आहे आणि गोलंदाजीसाठी तयार आहे. Be ready ”
The answer to “Where’s Pathirana”
He is fit and ready to throw Thunder ⚡ balls. Be ready 💣.
Finally a 📸 together with the Legend @matheesha_9 😄 #WhistlePodu #csk #IPL2024 pic.twitter.com/JKsv9gacWm— Amila Kalugalage (@akalugalage) March 22, 2024
नुकत्याच आलेल्या सर्व मीडिया रिपोर्ट्समध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत पाथिराना दुखापत झाल्याचे सांगण्यात आले होते. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, त्यामुळे तो आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर पडू शकतो, परंतु आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, तो स्पर्धेतील पहिला सामना आरसीबीविरुद्ध आज खेळणार की नाही हे पाहणे बाकी आहे.
चेन्नईसाठी आहे ट्रम्प कार्ड…
पाथिराना हा चेन्नईसाठी ट्रम्प कार्ड ठरला आहे. गेल्या मोसमात पाथिराना चेन्नईकडून 12 सामने खेळला होता. या सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 19.53 च्या सरासरीने 19 बळी घेतले होते. या कालावधीत त्याने 8.01 च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या होत्या.
चेन्नईने कर्णधार बदलला…
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले होते. पण आयपीएल 2024 सुरू होण्याच्या एक दिवस आधी, संघाने एक मोठा निर्णय घेतला आणि धोनीच्या जागी सलामीवीर रुतुराज गायकवाडला कर्णधार बनवले. संघाचा हा निर्णय खरोखरच धक्कादायक आहे.