पिंपरी – शाहूनगर येथे एका सदनिकेत आग लागून घरगुती साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. आग लागल्याची माहिती मिळताच चिखली उप अग्नीशमन पथक, पिंपरी अग्निशमन पथक, प्राधिकरण अग्निशमन पथक, तळवडे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले.
आग लागल्याचे समजताच आर्यनम सोसायटीतील रहिवासी खाली आले. इमारतीमधील इतरांच्या घरात आलेल्या धुरास दारे, खिडक्या उघडून वाट करून दिली. तसेच ज्या घराला आग लागली होती त्यातून दोन गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्या घरात आगीची घटना घडली त्यामध्ये एक ज्येष्ठ महिला राहत होती. मात्र आग लागल्याचे समजताच त्यांनी इतरांना सावध करीत इमारतीबाहेर आल्या.