श्रीलंका बॉम्बस्फोट : मृतांचा आकडा वाढला, सहा भारतीय मृत्युमुखी

कोलंबो – श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मृतांचा आकडा वाढला आहे. या बॉम्बस्फोटात सहा भारतीयांसह २९० जणांचा मृत्यू झाला आहे. ५०० हून अधिक लोक या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये जखमी झाले आहेत.

श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसल्याने या बॉम्बस्फोटांमागे नक्की कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेमध्ये कालपर्यंत २०७ हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावलेे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आज मृतांच्या संख्येत वाढ होऊन आतापर्यंत २९० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये ६ भारतीयांसह ३५ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार के जी हनुमंतरायाप्पा आणि एम रंगाप्पा या दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू या बॉम्बस्फोटात झाला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.