कोलोंबो – श्रीलंकेच्या नौदलाने १४ भारतीय मच्छिमारांना अटक केली असून त्यांच्या नौका जप्त केल्या गेल्या आहेत. श्रीलंकेच्या सागरी हद्दीमध्ये मासेमारी करण्याच्या आरोपावरून रविवारी जाफना प्रांताच्या उत्तरेकडील कराईनगरच्या किनार् या जवळून या मच्छिमारांना अटक करण्यात आली.
या वर्षात श्रीलंकेकडून अटक करण्यात आलेल्या भारतीय मच्छिमारांची संख्या २४० इतकी झाली आहे. यापूर्वी ६ डिसेंबरला किमान २१ भारतीय मच्छिमारांना अटक केली गेली होती. मन्नार आणि कोविलान येथून त्यांचे ३५ ट्रॉलर्स जप्त केले गेले होते. पाल्कच्या सामुद्रधुनीमध्ये पूर्वी श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छिमारांवर गोळीबार देखील केला होता.
भारतीय मच्छिमारांकडून श्रीलंकेच्या सागरी हद्दीक मासेमारी केली जाण्यावर उच्चस्तरिय अधिकाऱ्यांच्या चर्चेतून तोडगा काढला जावा, असे श्रीलंकेचे मत्स्योद्योग मंत्री डग्लस देवानंदा यांनी संसदेत बोलताना म्हटले होते.