पुणे : मोहम्मद शमी हा आयपीएल इतिहासातील यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे त्याने 2011 च्या आयपीएलपासून 77 सामन्यांतून 79 बळी पटकावले आहेत. 13-13 फेब्रुवारीला होणार्या आयपीएल 2022 मेगा लिलावात शमीला मोठी रक्कम मिळणार यात शंका नाही.
शमीने यापूर्वी आयपीएलमध्ये तीन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे- दोन वेळचे विजेते कोलकाता नाईट रायडर्स (2011-2013), दिल्ली कॅपिटल्स (2014-2018) आणि पंजाब किंग्ज (2019-2021).
आयपीएल 2022 लिलावापूर्वी, पंजाब किग्सने स्फोटक सलामीवीर मयंक अग्रवाल आणि उदयोन्मुख डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्यासह मागील हंगामातील केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबने शमीसह उर्वरित खेळाडूंशी विभक्त होण्याचा निर्णय घेतला म्हणजे भारतीय संघाच्या वरिष्ठ वेगवान गोलंदाजाला बेंगळुरू येथे दोन दिवसीय लिलावात सर्वांसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे लिलावात सर्वच संघामध्ये शमीसाठी चढाओढ पहायला मिळेल. या लेखातून यंदाच्या लिलावत शमीला करारबद्ध करण्यासाठी उत्सुक असलेल्या 3 संघांवर नजर टाकणार आहोत.
पंजाब किंग्ज
पंजाब किंग्सने जरी शमीला लिलावापूर्वी करारमुक्त केले असले तरी ते लिलावात पुन्हा शमीवर पैसे लावण्यास मागे पुढे पाहणार नाही. पंजाबसाठी शमीची सर्वोत्कृष्ट कामगिरी 2020 च्या मोसमात आली होती जिथे त्याने 14 सामन्यांमध्ये 20 बळी घेतले होते. तर 2021 च्या आयपीएलमध्ये 14 सामन्यांमध्ये 19 बळी घेऊन पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.
पंजाबने मागील हंगामातील स्फोटक सलामीवीर मयंक अग्रवाल आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्यासह फक्त दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. अशा प्रकारे, गेल्या दोन आवृत्त्यांमध्ये तो संघाचा सर्वात सातत्यपूर्ण गोलंदाज आहे हे लक्षात घेऊन शमीला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. पंजाब जर शमीला पुन्हा करारबद्ध करु शकली तर, पंजाबची वेगवान गोलंदाजीला नक्कीच बळकटी मिळेल.
कोलकाता नाईट रायडस
आयपीएल 2022 मेगा लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने त्यांनी यंदा कायम ठेवलेल्या खेळूंमध्ये स्फोटक सलामीवीर व्यंकटेश अय्यर, पॉवर-हिटर आंद्रे रसेल आणि रहस्यमय फिरकीपटू सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती याचा समावेश आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे केकेआरने त्यांच्या एकाही वेगवान गोलंदाजाला कायम ठेवलेले नाही. संघात ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स, भारतीय प्रतिभावान कमलेश नागरकोटी, शिवम मावी, प्रसिद्ध कृष्णा आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन यांच्यासारख्या काही उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांचा समावेश होता.
रसेल गेल्या काही हंगामापासून गोलंदाजी करत नसल्याने केकेआर पूर्णवेळ वेगवान गोलंदाजीच्या शोधात आहे. त्यामुळे, जेव्हा लिलावादरम्यान शमीच्या नावाची घोषणा केली जाईल, तेव्हा कोलकाता त्यांच्या माजी खेळाडूचे मोकळेपणाने स्वागत करण्यास उत्सुक असतील. याचबरोबर केकेआरला एक उत्कृष्ठ भारतीय वेगवान गोलंदाज शमीच्या रुपाने मिळू शकतो.
सनरायझर्स हैदराबाद
2016 च्या आयपीएलचे विजेते देखील मेगा लिलावापूर्वी ऑरेंज आर्मीने कर्णधार केन विल्यमसन आणि फलंदाज अब्दुल समद आणि वेगवान गोलंदाज उमरान मलिक या जम्मू आणि काश्मीर क्रिकेट जोडीला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मलिकने 150+ किमी प्रतितास सातत्याने वेगवान गोलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले असले तरी, तो अजूनही कच्चा आहे आणि त्याला अनुभवी सहाकार्याची आवश्यकता असेल आणि या क्षणी शमीपेक्षा चांगला कोणी नसेल. अशा प्रकारे, संधी मिळाल्यास, हैदराबाद प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत शमीला त्यांच्या वेगवान आक्रमणाला बळकट करण्यासाठी संघात घेण्यात अजिबात संकोच करणार नाहीत.