नवी दिल्ली – संधी मिळावी म्हणुन अनेक खेळाडू आपले वय लपवून स्पर्धांमध्ये भाग घेतात अशा वयचोरी करणाऱ्या खेळाडूंवर भारतीय बॅडमिंटन महासंघाने बंदी घालावी, जेणेकरून चुकीचे काम करणाऱ्या खेळाडूंवर वचक बसेल आणि भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील, अशी मागणी भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी केली आहे.
यावेळी बोलताना गोपीचंद म्हणाले की, माझ्या मते, महासंघाने कठोर निर्णय घेऊन वयचोरी करणाऱ्या खेळाडूंसमोर कठोर उदाहरण ठेवायला हवे. त्यामुळे खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. तसे झाल्यास, देशांतर्गत स्पर्धामध्ये वयचोरीचे प्रमाण कमी होईल, आणि त्याचा फायदा खरो खर चांगली कामगिरी करणाऱ्या आणि खेलात आपले भविष्य बनवू पहाणाऱ्या खेळाडूंना होइल असेही त्यांनी नमूद केले.