मुज्जफरनगर: सन 2017 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील सादर केला नाही म्हणून निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेशातील 493 उमेदवारांना अपात्र ठरवले आहे. पुढील तीन वर्षे त्यामुळे या उमेदवारांना कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. या यादीत मुज्जफरनगर जिल्ह्यातील सहा उमेदवारांचा समावेश आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक आधिकारी रमेशचंद राय यांनी आज ही माहिती दिली. लोकप्रतिनिधी कायद्यातील कलमानुसार निवडणुकीतील खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अशा प्रकारे अपात्र ठरवण्याची कारवाई करण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक खर्चाच्या बाबतीत बेफिकीरी दाखवणाऱ्या उमेदवारांना मोठीच चपराक बसली आहे. या निर्णयामुळे यंदा काही जणांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याच्या मनिषेवरही पाणी पडले आहे.