ललित मोदींचे पवारांकडून कौतुक

पुणे : ललित मोदी यांच्याकडे व्हिजन होती. आयपीएल स्पर्धेची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेतली. हीच स्पर्धा आज जागतिक क्रिकेटला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे, अशा शब्दात आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ललित मोदी यांचे कौतुक केले आहे.

पुण्यात एका खासगी संस्थेने आयोजित केलेल्या एका सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रक्षाचे अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते बोर्डे यांचा खास सत्कार करण्यात आला.

त्यावेळी शरद पवार बोलत होते. दरम्यान शरद पवार यांनी क्रिकेट क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी पवारांनी आयपीएलबाबत ललित मोदी यांचं कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मोदी त्यांच्या कल्पनेने प्रत्यक्षात ही स्पर्धा सुरू झाली व जागतिक क्रिकेटला नवे वळण लागले. त्यांनी केलेल्या या कामामुळे क्रिकेटमधील संपूर्ण अर्थकारणच बदलले, असेही पवार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.