31 ऑगस्टला बक्षिस वितरण होणार
पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाने राज्यातील शिक्षकांसाठी “शोध उत्कृष्ट अध्यापकाचा’ ही राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला राज्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ येत्या 31 ऑगस्टला पुणे येथे पत्रकार भवनात घेण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सुनिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या समारंभास महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दिनकर टेमकर आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. करोनाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा प्राथमिकचे अध्यक्ष एकनाथ आंबले, पुणे जिल्हा प्राथमिकचे सरचिटणीस रणजित बोत्रे, पुणे जिल्हा माध्यमिकचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, पुणे जिल्हा विधी सल्लागार समितीचे अँड.सचिन लंके, पुणे शहर प्राथमिकचे सरचिटणीस अतुल शेलार आदी पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
प्राथमिक विभागात अशोक चव्हाण (प्रथम), शोभा माने (द्वितीय), अमर संकपाळ (तृतीय), मंजिरी दोशी, जान्हवी माहूरकर, पुनम साळुंके (उत्तेजनार्थ), माध्यमिक विभागात जागृती महाजन (प्रथम), सचिन मिसाळ (द्वितीय), नरेंद्र लखाडे (तृतीय), अर्चना जगदाळे, हेमलता भागरे, पुरुषोत्तम मिसाळ (उत्तेजनार्थ) बक्षिसे जाहीर करण्यात आलेली आहेत. विशेष प्राविण्यात डॉ.गंगाराम ढमके, राजू साळी, सागर कांबळे यांचा समावेश करण्यात आलेला आहे.