पिंपरी -बुधवारी थेरगाव परिसरातील वातावरण काही निराळेच होते.. सकाळपासूनच रस्ते गर्दीने ओसंडू लागले.. ठिकठिकाणी मोठमोठ्या आकर्षक रांगोळ्या लक्ष वेधून घेत होते.. फटाक्यांची जोरदार आतषबाजी.. फुलांचा वर्षाव.. बाइकचा दणदणाट… अशा या प्रसन्न वातावरणात थेरगावकर उत्सुकतेने ‘त्यांची’ वाट पाहत होते… तेवढ्यात ‘ते आले.. त्यांनी पाहिलं.. आणि त्यांनी जिंकलं..!’ ते होते चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक चर्चेतले महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे!
जागोजागी नाना काटे यांच्या स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय त्यांच्याशी हस्तांदोलन करीत शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसला. महिलांनी त्यांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद आणि सदिच्छा दिल्या तर तरुण मुला- मुलींची त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली.
थेरगावात बुधवारी झालेल्या प्रचारफेरीत नाना काटे यांच्यासोबत माजी नगरसेवक संतोष बारणे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रेरणा बॅंकेचे माजी अध्यक्ष कांतीलाल गुजर, माजी नगरसेविका माया बारणे, प्रेरणा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तुकाराम गुजर, माजी नगरसेवक कैलास बारणे, सतीश दरेकर, यांच्यासह गोरक्षनाथ पाषाणकर, विशाल नंदूशेठ बारणे, संभाजी बारणे, विशाल पवार, शरद वारणे, प्रशांत संपकाळ, प्रभाकर ववले, अभिजित आल्हाट, विजय गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
थेरगावच्या बापुजीबुवा मंदिरामध्ये नारळ फोडून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही रॅली बापुजीबुवा नगर, जय मल्लार नगर, कैलास नगर, अशोका सोसायटी, बेलठिकानगर, गुजर नगर, गणेश नगर, वनदेवनगर, क्रांतीवीर नगरसह विविध परिसरातून प्रचारफेरी काढण्यात आली. चौका-चौकात नाना काटे यांचे थेरगावकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ज्येष्ठ नागरिकांनी काटे यांना वेळी विजयाबद्दल आशिर्वाद दिले. नानांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी काढण्यात आलेल्या बाइक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक सामिल झाले होते. या वेळी तरुणांमध्ये जोश पाहायला मिळाला. परिवर्तन अटळ आहे, नाना काटे झिंदाबाद, राष्ट्रवादी कॉंग्रेस झिंदाबाद, येऊन येऊन येणार कोण नानांशिवाय आहेच कोण! अशा घोषणांनी थेरगावचा परिसर दुमदुमला होता.