मुंबई – सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्म शाळा 1 मार्च पासून कोविड नियमांचे पालन करून सुरू होणार आहेत. महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शाळा सुरू केल्या जातील, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्म शाळा कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून येत्या 1 मार्च पासून सुरू करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शाळा सुरू केल्या जातील. #SJSA pic.twitter.com/hU1i6npAB1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 17, 2022
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात चालविल्या जाणाऱ्या दिव्यांग शाळा व कार्यशाळा आदी येत्या एक मार्चपासून शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले होते. महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच अन्य जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधून शालेय शिक्षण विभागाच्या 20 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग शाळा सुरू करण्याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यानुसार 1 मार्चपासून या शाळा सुरु होणार आहेत.