सातारा -राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या दि. 5 ऑक्टोबरच्या आदेशानुसार पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर माहे ऑक्टोबरपासून 3 महिन्यांकरिता विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील मागील वर्षांपासून राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेच्या धर्तीवर पुणे ते कोल्हापूर महामार्गावरील अपघातांचे व मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच या महामार्गावर वाहतुकीस शिस्त लागावी म्हणून ही विशेष तपासणी मोहिम सुरु करण्यात येत आहे. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याकरिता पुणे, कोल्हापूर, सातारा ही प्रादेशिक कार्यालये तसेच सांगली व कराड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालये या कार्यालयांच्या पथकांची सकाळी व रात्री याप्रमाणे तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
या तपासणी मोहिमेवर देखरेख, नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये पुढील बाबींवर विशेषत्वाने कारवाई करण्यात येणार आहे. वेगमयदिचे उल्लंघन करुन धावणारी वाहने, चुकीच्या मार्गिकेतून जाणारी तसेच चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणारी वाहने, विना सीटबेल्ट जाणारी वाहने, रस्त्याकडेला अवैधरित्या पार्किंग केलेली वाहने, उतारावर न्युट्रल गिअरमध्ये चालणारी जड मालवाहतूक वाहने, महामार्गावर दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न करणे.
त्याशिवाय तपासणी दरम्यान या महामार्गावरील ब्लॅक स्पॉटना भेटी देऊन या ब्लॅकस्पॉटची दुरुस्ती करुन घेण्यासाठी संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा करणे, इंटरसेप्टर वाहनांवर र्झीलश्रळल -ववीशीी डूीींशा चा वापर करुन त्याद्वारे वाहनचालकांना रहदारीचे नियम पाळण्यासंबंधी (उदा. लेन कटींग करु नये, वेग मर्यादिचे पालन करावे, रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी करु नयेत आदी सूचनांची वारंवार उदघोषणा करणे, महामार्गावर स्थापन केलेल्या समुपदेशन कक्षाद्वारे सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत समुपदेशनाचे कार्य सुरु ठेवणे, महामार्गावर विशेषतः घाटात अपघातप्रवण क्षेत्रांचे प्रमाण अधिक आहे त्याठिकाणी अपघातविषयक जनजागृती तसेच तपासणी करणे. तसेच एखाद्या ठिकाणी अपघात घडल्यास त्याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये याची काळजी घेण, याबाबतही दक्षता घेण्यात येणार आहे.
शिस्तपालन करावे ः विनोद चव्हाण
महामार्गावर सर्व वाहनधारकांनी रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने वाहतुकीच्या शिस्तीचे पालन करावे तसेच वाहन चालविताना वेगमयदिचे उल्लंघन न करण्यासह इतर सूचनांकड लक्ष देऊन वाहन चालविताना दक्षता घ्यावी. मोटार वाहन कायद्यातील नियमांचे तंतोतंत पालन करुन रस्ता सुरक्षा व विनाअपघात वाहन चालवून आपली व रस्ता वापरणाऱ्या इतर घटकांची सुरक्षा साध्य करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन विनोद चव्हाण यांनी केले आहे.