ड्रोन विषयी विशेष दक्षता घेतली जात आहे – सरकारचा दावा

नवी दिल्ली – ड्रोनचा वापर करून सरकारी आणि काही सार्वजनिक ठिकाणी हल्ले करण्याच्या घटना विदेशात घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशात असे काही प्रकार घडू नयेत म्हणून सरकार विशेष दक्षता घेत आहे अशी माहिती केंद्र सरकारच्यावतीने आज लोकसभेत देण्यात आली. गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी म्हणाले की सुरक्षा यंत्रणा आणि विविध राज्य सरकारांशी चर्चा करून यावर उपाययोजना केल्या जात आहेत.

देशात रिमोट द्वारे ड्रोन चालवण्यासाठी नागरी विमान वाहतूक खात्याची अनुमती घेणे आवश्‍यक करण्यात आले आहे. 27 ऑगस्ट 2018 रोजी तसा आदेश जारी करण्यात आला आहे. विमानतळांच्या जवळपास ड्रोन वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ड्रोनचा वापर विदेशात अनेक प्रकारच्या हवाई वाहतुकीसाठीही केला जात असला तरी भारतात मात्र अजून ड्रोन तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.