#SAvAUS : वाॅर्नरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; दक्षिण आफ्रिकेचा विजय

पोर्ट एलिझाबेथ : कर्णधार क्विंटन डी काॅकची शानदार अर्धशतकी खेळी आणि लुंगी एनगिडीच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील दुस-या टी-२० सामन्यात आॅस्ट्रेलियावर १२ धावांनी मात केली. या विजयासह आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी साधली आहे.

दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १५८ अशी मारली होती. प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाला २० षटकात ६ बाद १४६ धावांच काढता आल्या. आॅस्ट्रेलियाचा मागील नऊ टी-२० सामन्यांतील हा पहिलाच पराभव ठरला.

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी काॅक याने ४७ चेंडूत सर्वाधिक ७० धावा करत तर वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने ४ षटकात ४१ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद करत सर्वोत्तम कामगिरी बजावली. क्विंटन डी काॅक सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका – २० षटकात ४ बाद १५८( क्विंटन डी काॅक ७०, रैसी वैन डर डुसेन ३७, केन रिचर्डसन २-२१, कमिन्स १-३१, एडम जम्पा १-३७) वि.वि. आॅस्ट्रेलिया : २० षटकांत ६ बाद १४६( वाॅर्नर नाबाद ६७, स्मिथ २९, एनगिडी ३-४१, नाॅट्र्जे १-२४, रबाडा १-२७, प्रीटोरियस १-२९).

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.