पाकिस्तानला दहशवाद्यावर कारवाई करावी लागेल- ट्रम्प

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोटेरा स्टेडियममधील ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमास संबोधित केले. ट्रम्प यांनी पाकिस्तान मधून होणाऱ्या दहशतवादावर कडाडून टीका केली.

दहशतवादाबाबत ट्रम्प म्हणाले की, आमचे प्रशासन दहशतवादाविरूद्ध कठोर कारवाई करीत आहे, आम्ही पाकिस्तानवरही दबाव आणत आहोत. पाकिस्तानला दहशतवादाविरोधात कारवाई करावी लागेल.प्रत्येक देशाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले .

पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, अमेरिका इस्लामिक दहशतवादाचा बळी ठरला आहे. अशा दहशतवादाविरोधात अमेरिकेने लढा दिला आहे. अमेरिकेने आयएएसएस आणि अल बगदादीला सारख्या दहशतवाद्यांना कंठस्नान घेतल्याचे ते म्हणाले.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.