नवी दिल्ली – साऊथची सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रुती षणमुग प्रिया हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. श्रुतीचे पती अरविंद शेखर यांचे हृदयविकाराचा झटकाने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. अरविंद शेखर, वय 30, असून ते बॉडीबिल्डर होते. या जोडप्याचे मे 2022 मध्ये लग्न झाले होते.
अरविंद शेखर हे पेशाने फिटनेस कोच होते असे सांगितले जात आहे. त्यांचे वय 30 वर्षे होते. वृत्तानुसार, अरविंद शेखर यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. अरविंद गेल्या वर्षी झालेल्या मिस्टर तामिळनाडू 2022 स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते. या जोडप्याने मे महिन्यात त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा केला.
पतीच्या निधनानंतर श्रुती षणमुग प्रियाने पतीच्या नावाने एक पोस्ट शेअर केली आहे. अरविंद शेखरसोबतचा आनंदी आणि रोमँटिक फोटो शेअर करत श्रुतीने लिहिले की, ‘फक्त शरीर हे जग सोडून गेले आहे. पण तुमचा आत्मा आणि मन माझ्यासोबत आहे आणि आजही मला सुरक्षित ठेवत आहे आणि नेहमीच राहील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो प्रिय अरविंद शेखर.