मुंबई – साऊथ चित्रपटांप्रमाणे साऊथ अभिनेत्री देखील आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत राहतात. एकीकडे बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी पब्लिसिटी स्टंट किंवा अतरंगी कपडे घालण्याची स्पर्धा लागलेली असतात साऊथमधील काही अभिनेत्री मात्र याला अपवाद ठरताहेत. श्रद्धा आर्या त्यापैकीच एक नाव.
श्रद्धा आर्याने नुकतंच सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री डीप नेक ब्लाउज आणि ट्रान्सपरंट साडीमध्ये दिसत आहे.साधा सिम्पल परंतु अट्रॅक्टिव्ह असलेला श्राद्धाचा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. श्रद्धाच्या फोटोंवर लोक जोरदार कमेंटकरून तीच चांगलच कौतुक करत आहेत. फोटो शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने ‘पॉझिटिव्ह वाइब्स’ असेही लिहिले.
View this post on Instagram
श्रद्धा आर्याने कलवानिन कढाली’, ‘नरकोंडा पारवाई’ और ‘गोडवा अशा दर्जेदार साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.तिचा पती नौदलात असतो. तिच्या एका चाहत्याने ‘अशीच हसत रहा’ अशी कमेंट केली आहे तर दुसऱ्या एकाने तिला आगामी चित्रपट कोणता येणार आहे याबाबत विचारणा केली आहे. फक्त चाहतेच नाही तर अनेक साऊथ अभिनेत्रींनी देखील श्रद्धाच्या या लूकच कौतुक केलं आहे.