नवी दिल्ली : देशात सध्या दिवाळीची धामधुम सुरु आहे. फराळ, फटाके आणि नव्या कपड्यांची खरेदी सुरु आहे. त्यातच बिहारमधून एक व्हिडीओ समोर येत आहे. ज्यात एका मंत्र्यांना देखील फटाके फोडण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र हे करत असताना त्यांची चांगलीच फजिती झाल्याचे या व्हिडिओतून दिसून येत आहे.
बिहारमधील एका माजी आमदाराच्या बाबतीत घडला. फटाक्याला आग लावल्यानंतर माजी आमदार घाबरून पळाले. जेव्हा ते मागे फिरले आणि पळू लागले तेव्हा ते तोंडावर पडले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिहारमधील सोनपूरचे भाजपचे माजी आमदार विनय सिंह एका फुटबॉल मॅचच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. या दरम्यान त्यांच्यासोबत ही घटना घडली.
सारण-सोनपुर के पूर्व विधायक विनय सिंह एक खेल प्रतियोगिता के उद्घाटन के दौरान औंधे मुंह गिर पड़े
दरअसल पूर्व विधायक विनय सिंह उद्घाटन के दौरान पटाखा जला कर भागने की कोशिश कर रहे थे तभी उनका संतुलन बिगड़ गया और वह औंधे मुंह गिर पड़े pic.twitter.com/BJK4K1bxc1— varun Kumar (@2541d5aefcfa4e4) October 18, 2022
हा व्हिडीओ 3 ऑक्टोबरचा आहे, पण त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये माजी आमदार विनय सिंह उद्घाटन सामन्याआधी फटाके पेटवताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये त्यांच्याभोवती आणखी काही लोक उभे आहेत, त्यातील एकाने तर भीतीपोटी कान बंद केले आहेत.
विनय सिंगने फटाका पेटवताच ते घाबरून मागे धावले. ते करत असताना त्यांचा तोल बिघडतो आणि ते तोंडावर पडतात. हे पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक त्यांना उचलण्यासाठी गर्दी करतात. तर दुसरीकडे फटाकेही फुटले. विनय सिंह हे बिहार भाजपचे मजबूत नेते मानले जातात. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचा पराभव करून ते पहिल्यांदाच प्रकाशझोतात आले.