IPL 2024 (Rajasthan Royals & Joseph Buttler) : राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज सलामीवीर जोस बटलरने संघाला मोठा धक्का दिला आहे. बटलर आयपीएल 2024 मध्ये राजस्थानसाठी उर्वरित सामने खेळणार नसल्याची बातमी येत आहे. लवकरच पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 4 टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे, ज्यामध्ये खेळण्यासाठी बटलरने आयपीएल 2024 मधून आपले नाव काढून घेतले आहे.
22 मे ते 30 मे दरम्यान इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 4 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर T20 विश्वचषक सुरू होईल, ज्यामध्ये बटलर इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
राजस्थान रॉयल्सने जारी केला व्हिडिओ…
राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत ‘X’ खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जोस बटलर हॉटेल सोडताना दिसत आहे. त्याने आपल्या सहकाऱ्यांना मिठी मारली आणि कारमध्ये बसल्यानंतर त्याने राजस्थान रॉयल्सला ट्रॉफी जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
We’ll miss you, Jos bhai! 🥺💗 pic.twitter.com/gnnbFgA0o8
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 13, 2024
बटलरच्या जाण्याचा हा व्हिडिओ देखील भावूक करणारा आहे कारण बॅकग्राऊंडमध्ये ‘मैनु विदा करो’ हे गाणे वाजत आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, प्रत्येकजण जोस भाईला खूप मिस करेल.
IPL 2024 Final : विजेतेपदाची लढत कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या, किती असेल सर्वात स्वस्त तिकीट…
इतर अनेक खेळाडूही इंग्लंडला परतण्याची शक्यता…
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, विल जॅक, फिल सॉल्ट आणि रीस टोपले यांचाही समावेश आहे. त्यामुळे हे खेळाडूही या वीकेंडला इंग्लंडला परतू शकतात. बेअरस्टो आणि करन सध्या पंजाब किंग्जकडून खेळत आहेत, परंतु त्यांचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, विल जॅक आणि रीस टोप्ली आरसीबीच्या प्लेऑफच्या आशांना धक्का देऊ शकतात. फिल सॉल्ट आणि मोईन अली यांनी गेल्या सामन्यांमध्ये अनुक्रमे केकेआर आणि सीएसकेसाठी चांगली कामगिरी केली आहे.
IPL 2024 (KKR vs GT Match 63) : खराब हवामानामुळे टॉसला विलंब, चाहत्यांची होऊ शकते निराशा…
राजस्थान अद्यापही प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही…
इंग्लंडला परतण्यापूर्वी जोस बटलर राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी केली आहे. बटलरने या मोसमात 11 सामन्यांमध्ये 359 धावा केल्या आहेत आणि मोसमात 2 शतके करणारा तो आतापर्यंतचा एकमेव फलंदाज आहे. पॉइंट टेबलचा विचार करता, राजस्थान RR सध्या 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचे अजून 2 सामने बाकी आहेत आणि एक विजय त्याचे प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करेल.