-->

‘त्या’ प्रकरणी सोनू सूद, कंगना राणावतला उच्च न्यायालयाचा दिलासा

कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पालिकेला आदेश

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला आहे. तसेच पुढील सुनावणीपर्यत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

जुहू येथील एका निवासी इमारतीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून तिथं हॉटेल थाटल्याचा आरोप करत मुंबई महापालिका प्रशासनाने बजावलेल्या नोटीसीला आता सोनूने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर तातडीची सुनावणी पार पडली.

या सुनावणीत पालिकेने आपली नोटीस आणि दिलेली तक्रार ही योग्य आणि कायदेशीरच असल्याचे ठामपणे न्ययालयात सांगितले. पुढील सुनावणीत यासंदर्भातील सर्व कागदपत्र सादर करण्याचे निर्देश देत हायकोर्टाने सोनू सूदला 13 जानेवारीपर्यंत सत्र न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवत पालिकेला कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिलेत. मात्र “जर तुम्ही स्वच्छ हाताने न्यायालयात आला नसाल तर पुढे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, या शब्दांत न्यायालयाने सोनू सूदला इशारा दिला.

दुसरीकडे वादग्रस्त ट्‌विट केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अभिनेत्री कंगना राणावतविरोधात येत्या 25 जानेवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये आणि समन्स बजावू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. यामुळे पुन्हा कंगना आणि तिची बहिणीला दिलासा मिळाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.