माणसाने मांजराच्या पंज्यासारखे दिसणारे मोजे घातले आणि…

लंडन – मांजरींचा भयंकर लळा आणि वेड असलेल्या माजेद नावाच्या ब्रिटनमधील व्यक्तीने मांजराला गोंधळात टाकण्यासाठी त्याच्या पंज्यासारखे मोजे बनवून स्वतःच्या पायात घातले आणि मग ही छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल होण्यास वेळ लागला नाही. त्याची मुलगी हुदा हिने त्यांची पाळलेली मांजर आणि वडिलांनी पायात घातलेले मोजे यांचे फोटो काढले आणि ते व्हायरल केले. त्यामध्ये त्यांची ओमेई नावाची मांजर समोरचे पाय पाहून गोंधळल्याचे दिसत आहे.

या छायाचित्रांना प्रतिसाद देताना एका व्यक्तीने लिहिले आहे की, हे भयंकर आहे. मला असे दहा मोजे हवे आहेत. आणखी एकाने लिहिले आहे की, ही छायाचित्रे पाहून मी पोट दुखेपर्यंत हसलो.

शॉपी नावाची कंपनी अशा प्रकारचे मोजे विकते. त्या कंपनीनेही ट्विट करून प्रतिसाद दिलेला आहे. रसिक माणूस, असे त्या कंपनीने म्हटले आहे.

हुदा म्हणते की, माझ्या वडिलांची मोज्यांची निवड पाहून मला आधी लाज वाटली होती परंतु माझे वडील स्वतःशी प्रामाणिक आहेत हे मला समजले. ती म्हणते, शॉपीमधून माझ्या वडिलांनी मोजे आणले. करोनानंतरच्या काळात अशा विविध विचित्र गोष्टी शोधून त्या खरेदी करण्याची सवय त्यांनी लागलेली आहे. मला वाटते हा त्यांच्यातील जिवंतपणा आहे. मांजराच्या पंजाच्या रंगाचे मोजे आणून ते पायात घालणे यातून त्यांच्यातील चैतन्य दिसून येते.

हुदाने हे मोजे आणि मांजराच्या चेहऱ्यावरचे भाव दाखवणारी छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली होती. त्याला चार लाख लाईक मिळाली आणि 91 हजार जणांनी ते रिट्विट केले. ते मोजे मांजरीच्या पंजाइतके हुबेहुब आहेत की क्षणभर काय करावे हे त्या ओमेईलाही कळत नाही. हुदा म्हणते, माझ्या वडिलांना मांजरे खूप आवडतात. त्यांच्या जीन्सच्या पँटवरही त्यांनी मांजराचे चेहरे एम्ब्रॉयडरी करून घेतले आहेत. टॉयलेटमध्येही त्यांनी मांजराची स्टिकर्स लावली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.