सोनम कपूरने बॉलीवूडमध्ये ऍक्टिंग करायला सुरूवात केल्याला अलिकडेच 13 वर्षे पूर्ण झाली. सिनेमातील महिलांच्या व्यक्तिरेखांबद्दल सोनम कपूर नेहमीच काही तरी भाष्य करत असते. यापूर्वी तिने सिनेमांमध्ये हिरोईनच्या नावासंदर्भात देखील एक हॅशटॅग अभियान चालवले होते.
View this post on Instagram
फिल्म करिअरला 13 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देखील तिने आपल्या या मुद्दयावर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. सिनेसृष्टीत महिलांच्या व्यक्तिरेखांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी तिने हा पुढाकार घेतला आहे. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपली मते खुलेपणाने मांडली आहेत.
View this post on Instagram
बॉलीवूडमध्ये महिलांना ज्या पद्धतीने सादर केले जाते, ते आता बदलले पाहिजे. सिनेमातली गाणी असो वा रोमान्स अथवा कथेतील महिलांचे स्थान असो. सर्वच बाबतीत महिलांसंदर्भात एक ठाम स्टॅन्ड घेणे गरजेचे आहे. अन्यथा अभिनेत्रींना सिनेमांमध्ये अशाच प्रकारच्या रोलपुरते मर्यादित रहायला लागेल.
View this post on Instagram
यशस्वी होण्यासाठी मोठ्या कलाकारांबरोब्र काम करणे अथवा अयोग्य् पदध्तीने स्वतःचे प्रदर्शन करण्यापासून अभिनेत्रींनीही स्वतःला रोखले पाहिजे, असे सोनमने म्हटले आहे. महिलांबद्दल खूपच चुकीच्या धारणा समाजामध्ये पसरलेल्या आहेत. या बदलण्यासाठी महिलांमध्येच जागृती होणे गरचेचे अहे, असे तिने म्हटले आहे.
View this post on Instagram