नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. बॉलीवूड स्टार आपल्या हटके अंदाजात नवीन वर्षाचे स्वागत करत आहे. काही स्टार हॉलिडे साठी विदेशात गेल्याचे बघायला मिळत आहे तर काही घरीच नवीन वर्षाची एन्जॉय करतांना दिसत आहे. अशात अभिनेत्री सोनम कपूर तिच्या लंडन येथील घरी पती आनंद अहुजा सोबत वेळ घालवतांना दिसत आहे. तिने नुकताच सोशल मीडियावर एक विडिओ शेअर केला आहे.
या पोस्टसह तिने एक लांब लचक मजकूर लिहिला आहे. या मजकुरात तिने २०२३ मधील आई बनण्याच्या अनुभव आणि आनंद आहुजाच्या आजाराबाबत अनेक खुलासे केले आहे. तिने या पोस्ट मध्ये तिच्या लाईफचे अप अँड डाउन चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
२०२३ हे वर्ष खूप उतार चढावांनी भरलेले होते. आम्ही दोघांनी हे स्वीकार केले की आता आम्ही आई वडील झालो आहे. आई होणे जितके आनंद देणारे आहे तितकेच लेकाच्या काळजीने भीती देणार सुद्धा असते. हे सर्व समजणे आणि समजल्यानंतर स्वीकारणे खूप वेगळा अनुभव आहे. आमच्यात भावनात्मक, शारीरिक आणि आध्यात्मिक बदल झाला आहे. हा पूर्ण एक प्रवास होता.
सोनमने नोटमध्ये पुढे लिहिले की, ‘माझे पती 2023 मध्ये खूप आजारी पडले. डॉक्टरांना लवकर याबाबत कळू शकले नाही. ते तीन महिने माझ्यासाठी नरकासारखे होते पण देवाच्या कृपेने आणि डॉ. सरीन यांच्या मेहनतीने ते आज सुखरूप आहे. आनंद आता पूर्णपणे बरा आहे. सोनमने तिच्या पतीच्या व्यवसायाचा उल्लेख केला आणि लिहिले की, ‘मी माझ्या पतीला त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सक्षम आहे आणि त्यांचा व्यवसाय देखील खूप वाढत आहे, यासाठी मी देवाची देखील आभारी आहे. असं लिहीत सोनमने इमोशनल होत खुलासे केले.