WhatsApp Ban: व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे जगभरातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. भारतात या अॅप्सचे 50 कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यातील 71 लाखांहून अधिक अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपने अनेक युझर्सना मोठा झटका दिला आहे. कंपनीने IT नियम 2021 अंतर्गत ही कारवाई केली आहे. WhatsApp ने नोव्हेंबर 2023 मध्ये कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या 71,96,000 वापरकर्त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे. यापैकी 19,54,000 अशी खाती आहेत ज्यांची कोणीही तक्रार करण्यापूर्वीच कंपनीने स्वतः बंदी घातली.
नोव्हेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपवर 8841 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना दर महिन्याला आपला रिपोर्ट सादर करावा लागतो. जर तुम्ही तुमचे खाते WhatsApp च्या नियम आणि अटींनुसार ऑपरेट केले नाही तर तुमचे खाते देखील बॅन केले आहेत. जर तुम्ही अश्लील घोटाळा, फसवणूक, चोरी, देशाविरोधातील कोणत्याही प्रकारबाबत काही पोस्ट करत असाल तर कंपनी कधीही तुमचे खाते बंद करू शकते.
मागील वर्षी, व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी अॅपमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत, ज्यात चॅट लॉक, ईमेल अॅड्रेस लिंक यासारखे फीचर आहेत. तुम्ही अजून तुमचा ईमेल आयडी तुमच्या WhatsApp खात्याशी लिंक केला नसेल, तर तो लिंक करा. असे केल्याने तुम्ही ईमेलद्वारेही तुमच्या खात्यात लॉगिन करू शकाल. ज्यामुळे तुमचे खाते सुरक्षित राहते.
दरम्यान, भारत सरकार देखील लाखो भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांना सक्षम करण्यासाठी अलीकडेच तक्रार अपील समिती (GAC) लाँच केली आहे. ज्यात लोकांच्या तक्रारीबाबत पाहिले जाते. याशिवाय नव्याने स्थापन केलेले पॅनेल, मोठ्या टेक कंपन्यांवर लगाम घालण्यासाठी देशातील डिजिटल कायदे मजबूत करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.