सोनाक्षी सिन्हाने सुरू केले “ककुडा’चे शूटिंग

आरएसव्हीपीने आपल्या आगामी हॉरर-कॉमेडी “ककुडा’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम आदी कलाकार मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा श्रीगणेशा झाला असून शूटिंगला प्रारंभ करण्यात आला आहे.

निर्माता आदित्य सरपोतदार यांच्या दिग्दर्शनाखालील हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी “क्‍लासमेट्‌स’, “माउली’ आणि “फास्टर’ यासारखे हिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे.

या चित्रपटासंदर्भात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणाली, सद्यपरिस्थिती पाहता एका कॉमेडी चित्रपटांची वास्तविक गरज आहे. मला “ककुडा’ची स्क्रिप्ट वाचताच क्षणी आवडली होती. हा त्या प्रकारचा चित्रपट आहे, जो मी प्रेक्षक म्हणून पाहू इच्छिते.

अभिनेता रितेश देशमुख म्हणाला, सोनाक्षी आणि साकिबसोबत काम करण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. मला व्यक्‍तिगत रूपात हॉरर-कॉमेडी चित्रपट खूपच आवडतात आणि “ककुडा’ हा चित्रपट माझयासाठी एक शानदार संधी असल्याचे त्याने सांगितले.

दरम्यान, आरएसव्हीपी द्वारा प्रस्तुत “ककुडा’ या चित्रपटाचे शूटिंग गुजरातमधील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग वर्षाअखेर पूर्ण करण्याचे प्लानिंग असून 2022च्या प्रारंभी चित्रपट रिलीज होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.