पोर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर पॉर्नोग्राफी चित्रपट बनविल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज राज कुंद्राची न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यास आज न्यायालयात हजरकरण्यात आले होते.

राज कुंद्रा आणि रायन थार्पचा लँपटाँप पोलिसांनी जप्त केला असून यांची मुंबई पोलिसांकडून अधिक चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी न्यायालयात राज कुंद्राच्या बेकायदेशीर उद्योगांबद्दल आणखी माहिती मिळावी यासाठी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. पोलिसांची ही मागणी न्यायालयाने मान्य केली असून कुंद्राच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

राज कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये सॅमबॉक्स नावाच्या फोल्डरमध्ये 48 जीबीचा डेटा जप्त केला आहे. जप्त केलेल्या डेटामध्ये हॉटशॉटचे 51 व्हिडिओ, एका Whats Appमध्ये राज यांच्याकडे काम करणाऱ्या महिलेला पुन्हा कामावर घेण्याबाबत उमेश कामत याची विनंती आहे.

दरम्यान राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी रहावे लागणार आहे. यासंदर्भात आज न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.